सेन्सेक्स 227 अंकांनी तेजीत : सलग तिसरे सत्र मजबूत
वृत्तसंस्था/मुंबई
चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. जवळपास मागील तीन सत्रांमध्ये बाजाराने तेजी कायम ठेवली आहे. जागतिक बाजारांमधील तेजीचा कल कायम राहिल्याचा फायदा हा गुरुवारच्या सत्रात झाल्याचे दिसून आले. जागतिक बाजारांमधील तेजीमुळे भारतीय बाजारात गुरुवारी महिना अखेरच्या लगबगीमुळे ट्रेडिंग सेशन वधारुन बंद झाले. दरम्यान सरकारी पीएसयू कंपन्यांचे समभाग आणि बजाज फायनान्स यांचे समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. याउलट ऑटो क्षेत्रातील टाटा मोटर्सचे समभाग घसरणीत राहिले होते. बीएसई सेन्सेक्स गुरुवारच्या सत्रात हलक्या तेजीसोबत 76,598 अंकांवर सुरु झाला. मात्र तो घसरणीसोबत कार्यरत राहिला होता. दिवसअखेर सेन्सेक्स 226.85 अंकांनी वधारुन निर्देशाक 0.30 टक्क्यांसह 76,759.81 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीची नकारात्मक सुरुवात झाली. परंतु निफ्टी दिवसअखेर 86.40 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 23,249.50 वर बंद झाला आहे.
फेडरलच्या व्याजदरात बदल नाही
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक यांनी आपल्या व्याजदरात कोणताही बदल न करता तो स्थिर ठेवला आहे. व्याजदराच्या कपातीचा सलगचा निर्णय फेडरलने थांबविला आहे. कारण आर्थिक आणि राजकीय घडामोडींचे संकेत लक्षात घेत हे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट केले आहे. फेडरलने आपले व्याजदर 4.25 टक्के ते 4.5 टक्क्यांवर स्थिर ठेवले आहेत.
‘या’मुळे बाजार चमकला
- सरकारी कंपन्याचे समभाग आणि बजाज फायनान्स यांच्या समभागांमधील सकारात्मक कामगिरीचा लाभ झाला.
- यासह रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल यांचे समभाग वधारल्याने त्याचा फायदा बाजाराला झाला.
- जागतिक पातळीवर सकारात्मक स्थिती राहिली.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- भारत इलेक्ट्री. 278
- पॉवरग्रिड कॉर्प 295
- हिरो मोटोकॉर्प 4177
- भारती एअरटेल 1640
- सिप्ला 1457
- ओएनजीसी 256
- बजाज फायनान्स 7901
- नेस्ले 2217
- महिंद्रा-महिंद्रा 2971
- ग्रासिम 2491
- कोल इंडिया 385
- रिलायन्स 1253
- जेएसडब्ल्यू स्टील 950
- बजाज ऑटो 8747
- एशियन पेंटस् 2249
- डॉ. रे•िज लॅब्ज 1194
- एचयुएल 2408
- इंडसइंड बँक 957
- एचडीएफसी लाइफ 634
- एचडीएफसी बँक 1691
- एसबीआय लाइफ 1472
- ब्रिटानिया 5075
- आयटीसी 436
- टाटा कन्झ्यु. 966
- हिंडाल्को 587
- अपोलो हॉस्पिटल 6824
- एसबीआय 762
- एनटीपीसी 323
- आयसीआयसीआय 1255
- टाटा स्टील 131
- सनफार्मा 1739
- मारुती सुझुकी 12000
- अॅक्सिस बँक 984
- बीपीसीएल 257
- टीसीएस 4100
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टाटा मोटर्स 696
- अदानी एंटरप्रायझेस 2252
- श्रीराम फायनान्स 538
- बजाज फिनसर्व्ह 1745
- अदानी पोर्टस् 1077
- ट्रेंट 5511









