मुंबई
औषध निर्माती कंपनी ग्लेनमार्क फार्मासुटीकल्स लि. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लि.मधील 75 टक्के हिस्सेदारी विकणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरची हिस्सेदारी निरमा लिमिटेडला विकली जाणार आहे, अशीही माहिती आहे. या हिस्सेदारी विक्रीचा व्यवहार 5,652 कोटी रुपयांमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच हा व्यवहार दोन्ही कंपन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.









