आमदार कार्लुस आल्वारीस फरेरा यांचा सल्ला
म्हापसा : आमची विकासकामे बंद ठेवण्यासाठी सध्या माजी आमदार लोकांना पुढे काढत आहे हे आपणास पूर्णत: माहीत आहे. पंचायत मंडळालाही काही ठिकाणी वापर करतात. आपण जी चांगली कामे विकासाची करीत आहे तेथे माजी आमदारांनी नाहक वैफल्यग्रस्त होऊ नये असे आपण या प्रसार माध्यमातून त्यांना सांगतो असे आमदार कार्लुस आल्वारीस फरेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष विवेक डिसील्वा, हळदोणा गटाध्यक्ष आश्वीन डिसोझा, उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, युवा अध्यक्ष नवशाद चौधरी उपस्थित होते. आपला पेट्रोल पंप, हॉटेल रेस्टॉरंट वा दारूचे दुकान नाही. आपण कधी कमिशनही घेत नाही वा मागत नाही. आपला गैरव्यवहार नाही. लोकांसाठी आपण काम करतो हेच हळदोणा वासियांसाठी आपले मोठे योगदान आहे. उलट 1 कोटी 20 लाखाची कामे हळदोणात केली असे सांगून माजी आमदार हळदोण वासियांची फसवणूक करीत असल्याचा आरोप फरेरा यांनी केला. पुढे बोलताना आमदार अॅङ कार्लुस म्हणाले की, ग्लेन टिकलो सांगतात हळदोण्यात 1 कोटी 20 लाखाच्या निविदा आपल्या कारकिर्दीत मंजूर झाल्या. सप्टेंबर 2021 मध्ये टिकलो यांनी एका मंदिरात आपण 1 कोटी 20 लाखाची कामे मंजूर करून आणल्याचे हळदोणा वासियांना सांगितले होते. पण नंतर जानेवारी 2022 मध्ये निवडणुकीपूर्वी पत्रकारांनी त्यांना विचारले असता लोकांनी तुम्हाला पुन्हा का निवडून द्यावे त्यावेळी ते म्हणाले, आपण 100 कोटीची कामे आपण 5 वर्षात केली आहे असे सांगून फक्त लोकांची फसवणूक केली.
आपण नव्याने निविदा आणल्या
आपण वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांच्याकडे हळगोणातील वीजेबाबत अर्धातास चर्चा केली व त्यांनी विधानसभेत हळदोण्यात भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे आपल्यास स्पष्ट केले. आपण कार्यकर्ता अभियंत्याला पत्र लिहिले असता आपण 2017 ते 2022 भूमिगत विज वाहिन्यासाठी हळदोण्यात 1 कोटी 20 लाखाची निविदा असल्याचे विचारल्यास अभियंत्यांनी नाही म्हणून उत्तर दिले. येथे माजी आमदारांची फसवणूक उघड होते. वा येथे अन्य काही निविदा आहे काय असे विचारल्यास नाही म्हणून उत्तर आले. यावरून ग्लेन टिकलो जनतेची आणि हळदोणा वासियांची फसवणूक करीत असल्याचे आमदार कार्लुस यांनी उघड केले.









