बकरी ईदसाठी आणल्याचा संशय. डिचोली पोलिसांची धडक कारवाई. गोप्रेमींकडून कारवाईचे स्वागत. राज्यातील इतरही पोलीस स्थानकांनी अशीच कारवाई करावी. बैलांची रवानगी सिकेरी गोशाळेत.
डिचोली : मुस्लिमवाडा डिचोली येथील मशिदीच्या मागील बाजूस छुप्या पध्दतीने बांधण्यात आलेल्या 25 बैलांना डिचोली पोलिसांनी धडक कारवाई करत जिवनदान दिले. या बैलांना बकरी ईदनिमित्त आणण्यात आले होते, असा संशय डिचोलीतील गोप्रेमींनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्व गोप्रेमींनी मात्र स्वागत व कौतुक केले आहे. गुरूवारी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मशिदीच्या मागे अवैद्यरित्या छुप्या पध्दतीने गुरांना बांधण्यात आले असून त्यांची ईदच्या दिनी बेकायदा कत्तल करण्याचा हेतू असू शकतो, अशी माहिती डिचोली पोलिसांनी विश्वसनीय सूत्रांकडून मिळताच डिचोली पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांनी पोलीस पथक घेऊन थेट मशिदीच्या मागे धाड घातली.
तेथे एक तात्पुरता ताडपत्रीचा निवारा तयार करून 25 लहान मोठ्या बैलांना बांधून ठेवण्यात आले होते. व ते बाहेर दिसू नये याचीही काळजी घेण्यात आली होती. या बैलांबध्दल चौकशी केली असता योग्य माहिती कोणी देऊ न शकल्याने त्यांची रवानगी सिकेरी मये येथील गोशाळेत करण्याचे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे गोशाळेची गाडी व कर्मचारी डिचोलीत दखल होताच बैलांना गोशाळेत हलविण्यात आले. मशिदीच्या मागील बाजूस बेकायदेशीर गुरांना आणण्यात आल्याचे कळताच सदर कारवाई करण्यात आली आहे. या गुरांना जिवनदान देण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांनी सांगितले. डिचोलीत ईदानिमित्त आणण्यात आलेल्या गुरांना डिचोली पोलिसांनी धडक कारवाई करत दिलेले जिवनदान स्वागतार्ह आहे. यापूर्वी आम्ही अशा प्रकारे होण्राया बेकायदेशीर कत्तलींची माहिती पोलिसांना देत होतो. परंतु समाधानकारक कारवाई होत नव्हती. परंतु यावेळी पोलिसांनी केलेली कारवाई अभिनंदनास पात्र असून या कारवाईचा बोध इतरही पोलीस स्थानकांनी घ्यावा व गोहत्येपासून गुरांना वाचवावे. या एका कारवाईतून राज्यभरात पोलीस बेकायदा गोहत्येविरूध्द कारवाई करत असल्याचा संदेश जाणार असून अशा प्रकारांना आळा बसणार.आहे, अशी प्रतिक्रिया प्राणीमित्र अमृत सिंह यांनी व्यक्त केली.









