बेळगाव प्रतिनिधी– डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना कॉमर्स करण्यासाठी प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत आहे. तेंव्हा नियमानुसार आम्हाला कॉमर्स शिक्षणासाठी प्रवेश द्यावा, या मागणीसाठी पॉलिटेक्नीक कॉलेजमधील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये तीन वर्षे इंजिनिअरिंग शिक्षण क्रम घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना कॉमर्स बीकॉम पदवी पहिल्या वर्षाला प्रवेश देणे शक्य आहे. त्याबाबत शिक्षण विभागाने आदेश काढला होता. मात्र राणी चन्नमा विद्यापीठामध्ये आम्हाला प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असून आम्हाला
प्रवेश द्यावा, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









