अखंड कर्नाटक महासभा संघाचे विधानसौध परिसरात आंदोलन
बेळगाव : मुडलगी तालुक्यातील कुलगोड पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान देवस्थानचे पुजारी बाळकृष्ण रामचंद्र गुरव यांच्या कुटुंबीयांना विनाकारण त्रास दिला जात आहे. त्यांना मारहाणही केली जात आहे. सदर प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी अखंड कर्नाटक महासभा संघातर्फे करण्यात आली आहे. येथील हनुमान देवस्थानच्या पुजाऱ्याची हत्या करण्यात आली. शिवाय गुरव कुटुंबीयांना सातत्याने त्रास दिला जात आहे. 10 ते 15 जण गुरव कुटुंबीयांना धमकावत आहेत. त्यामुळे गुरव कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे म्हटले आहे.









