बेळगाव : मराठी नगरसेवकांसाठी बेळगाव महानगरपालिकेत स्वतंत्र्य कक्ष देण्याची मागणी आज नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापौराकडे केली.
महानगरपालिकेत चार मराठी नगरसेवक असून या सर्वांचा स्वतंत्र गट आहे. तसेच प्रभागातील नागरिकांची भेट घेणे आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात स्वतंत्र कक्षाची गरज आहे. असे पत्रात म्हटले आहे. यासंदर्भातील निवेदन महापौर शोभा सोमणाचे यांना देण्यात आले.









