आंदोलनाद्वारे विधानसौध परिसरात मागणी
बेळगाव : अखिल कर्नाटक आदि बणजिग समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या या समाजासाठी सरकारने सोयीसुविधा पुरवाव्यात, अशा मागणीसाठी अखिल कर्नाटक आदि बणजिग समाजातर्फे आंदोलन छेडण्यात आले. विजापूर जिल्ह्यात आदि बणजिग हा स्वतंत्र समाज आहे. मात्र या मागास समाजासाठी सरकारकडून कोणत्याच सोयीसुविधा मिळत नाहीत. त्याबरोबर या समाजाचा दोन डी श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र समाजाला आरक्षणाची गरज आहे. सरकारने आरक्षणाबरोबर विविध सोयीसुविधा मिळवाव्यात अशी मागणीही आदि बणजिग समाजाने केली आहे.









