बेळगाव प्रतिनिधी – उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी आंदोलन केले, मात्र तो तोडगा निघाला नाही, हे दुर्दैव आहे. तेव्हा तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावा. या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव दिला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शेतकऱ्याने उसाला प्रतीटन 5500 रु. दर मागितला आहे. त्यानुसार तातडीने तो दर जाहीर करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी आपले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleतीन जि. पं. मतदारसंघांत 46.66 टक्के मतदान
Next Article मडगावच्या विकासाठी ‘भिवपाची गरज ना’