कर्नाटतातील बेल्लारी (Bellari) जिल्ह्यातून कर्नाटकमधील येत्या निवडणुकीचे रणशिंग फुंकून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कर्नाटकातील मतदारांना “भाजपला निर्णायक जनादेश” देण्याचे आवाहन केले. भाजपला कर्नाटकमध्ये स्पष्ट बहूमत मिळाले तर ते राज्याला विकासाच्या बाबतीत दक्षिण भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू असा दावा केला.
काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बेल्लारी जिल्ह्यातील सांडूर येथून जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narandra Modi) आणि बीएस येडियुरप्पा (BS Yediyurrappa) यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून भाजपला पूर्ण जनादेश द्या. आपल्या जनादेशानंतर आम्ही राज्याला असे सरकार देऊ की ते कर्नाटकला भ्रष्टाचारमुक्त करून दक्षिण भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनवेल.”
आपल्या भाषणात काँग्रेस आणि जेडी (एस) (JDS) वर जोरदारपणे टिका करताना त्यांनी घराणेशाही पक्ष म्हटले आहे. “या दोन पक्षांना मतदान करणे म्हणजे भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणाला मतदान करण्यासारखे आहे. JD(S) ला मिळालेल्या प्रत्येक मताचा काँग्रेसला फायदा होईल. काँग्रेसला मिळालेल्या प्रत्येक मताचा फायदा सिद्धरामय्या यांना होईल.” असा आरोप अमित शहा यांनी केला.
पुढे बोलताना भाजपच्या यशावर प्रकाश टाकत शाह म्हणाले की, “एकीकडे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आहे जो भारताला बळकट करण्यासाठी आणि त्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहे. तर दुसरीकडे, राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आहे जी “तुकडे-तुकडे गँगशी जोडली गेलेली आहे.” असे बोलून त्यांनी कॉंग्रेसवर घणाघात केला
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









