सौंदत्ती तालुक्यातील नागरिकांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
सौंदत्ती तालुक्यातील इंचल व हिरेकोप्प या गावांतील अनेक घरे कोसळली होती. 2019-20 साली झालेल्या पावसामध्ये घरे कोसळली असताना अद्याप त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. घरे पडलेल्यांना नुकसान भरपाई देण्याऐवजी इतरांनाच नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तेंव्हा या प्रकरणाची चौकशी करून ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांनाच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे या दोन्ही गावांतील 27 घरे जमीनदोस्त झाली होती. त्यांचा सर्व्हे करून नुकसान भरपाई देणे बंधनकारक होते. मात्र लोकप्रतिनिधींनी चुकीची माहिती दिली. त्यानुसार घरांचा निधी देण्यात आला आहे. ज्यांची घरे पडली आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाहीत. मात्र इतरांनाच भरपाई मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेंव्हा तातडीने याची चौकशी करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुरेश वाती, कल्लाप्पा हरियाळ, मल्लिकार्जुन जुटण्णावर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









