कदंबच्या इलेक्ट्रीक बस चालकांची मागणी, : ‘कदंब’ने शब्द न पाळल्याचा आरोप
पणजी : कदंब महामंडळाने इलेक्ट्रीक बसेसवर ऊजू होताना किमान 22 हजार ऊपये वेतन देण्याचे मान्य केले होते. परंतु प्रत्यक्षात 18 हजार ऊपयेच हातावर टेकवण्यात आले. या 18 हजार वेतनावर जगायचे कसे? असा प्रश्न विचारत किमान 25 हजार ऊपये पगारवाढ मिळावी, अशी जोरदार मागणी कदंब महामंडळाच्या इलेक्ट्रीक बस चालकांनी केली. पगारवाढ कदंब परिवहन महामंडळ लिमिटेडच्या इलेक्ट्रिक बसचा वापर करणाऱ्या प्रवाशांना आज अडचणीचा सामना करावा लागला. अचानक पुकारलेल्या या संपामुळे पणजी, मडगाव, कारवार मार्गावरील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून कदंब महामंडळाने त्यांच्या अतिरिक्त चालकांचा वापर करून 20 मार्गांवर बसेस परत ठेवण्याचा निर्णय घेतला. इलेक्ट्रीक वाहनावरील चालकांनी आपले काम लवकरात लवकर सुरू न केल्यास त्यांच्या जागी कदंबचे अन्य चालक सेवेसाठी नेमले जातील, असे सांगितले. कदंब महामंडळाने ऑलेक्ट्रा या खासगी कंपनीकडून 51 इलेक्ट्रीक बसेस भाडेपट्टीवर चालविण्यात घेतल्या आहेत. या बसेसवर साधारणत: 140 कंत्राटी चालक आहेत. त्यांना सुरवातीला कदंब महामंडळाने 22 हजार ऊपये वेतन देण्याचे मान्य केले होते. परंतु प्रत्यक्षात 18 हजार ऊपयेच देण्यात येत असल्याचा दावा संप केलेल्या चालकांनी केला आहे. त्यामुळे आता 25 हजार ऊपये वेतन द्यायला हवे, या मागणीवर ते ठाम राहिले आहेत. आजच्या या संपामुळे 51 बसेस बंद राहिल्या. थ्यामुळे मडगाव-पणजी, मडगाव-वास्को आणि मडगाव-कारवार या मार्गावरील प्रवाशांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले.
गेल्या दोन महिन्यांपासून पगारवाढीची मागणी….
आज अचानक संपावर गेलेल्या चालकांनी सांगितले की, गेले दोन महिने पगारवाढ करावा, अशी मागणी कदंब महामंडळाकडे करण्यात येत आहे. परंतु आमच्या मागण्यांवर फारसे गांभीर्याने घेण्यात न आल्याने आज हा संप करण्यात आला, असा इलेक्ट्रीक वाहनाच्या चालकांनी सांगितले.
गोवा सरकारला ईव्ही बसेसचा पुरवठा करणारी कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड अंतर्गत चालक कार्यरत आहेत. कदंबच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या चालकांपेक्षा इलेक्ट्की वाहनांवरील चालकांना पगार जास्त मिळतो. याचा विचार इलेक्ट्रीक वाहनावरील चालकांनी न करता संप पुकारला. त्यांनी आजचा केलेला संप हा बेकायदेशीर आहे.
– उल्हास तुयेकर, अध्यक्ष ा कदंब वाहतूक महामंडळ









