Maharashtra Monsoon Session 2022 : दहीहंडीच्या थरावरून कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या संदेश दळवी ( वय-२३) याच्या घरच्यांना शिंदे-भाजप सरकारने दहा लाख रुपये जाहीर केले आहेत. ती मदत तात्काळ द्यावी तसेच त्यावेळी जखमी झालेल्यांनाही मदत देणार आहात का? असा सवाल विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केला. तसेच याबाबत सरकारने खुलासा करावा अशी मागणी आज विधानसभेत केली.
शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी दहीहंडी उत्सवात मृत व जखमी झालेल्या गोविंदाना मदत करणार का असा स्थगन प्रस्ताव मांडला होता. तो स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला होता. मात्र, आमदार अजय चौधरी यांनी उपस्थित केलल्या या मुद्द्यावरून अजित पवार यांनी सरकारला विचारणा करत खुलासा करायला भाग पाडले.
कोरोना काळात सण, उत्सव साजरे करता आले नव्हते, मात्र यावर्षी सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना दहीहंडीमध्ये अनेक तरुण रचलेल्या थरावरून कोसळून जखमी झाले आहेत तर मुंबईत एका २३ वर्षाच्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या गोविंदाच्या नातेवाईकांना तात्काळ दहा लाख द्यावेत. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यात गोविंदा जखमी झाले आहेत त्यांनाही तात्काळ मदत द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
दरम्यान यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदेश दळवी याच्यावर उपचाराचा खर्च करण्यात आला आहे. आता त्याच्या घरच्यांना मदत देण्याचे व जखमींनाही मदत दिली जाईल असे आश्वासन दिले.
Previous Articleखानापूर येथील १६ शेतकऱ्यांची २० लाखांची फसवणूक
Next Article विधानसभेत मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना भावनिक साद…








