प्रतिनिधी / बेळगाव
जीआयटीच्या एमबीए विभागाला बिझनेस टुडे या मासिकाने ‘बेस्ट बी स्कूल्स ऑफ इंडिया 2022’च्या क्रमवारीत 146 वा क्रमांक दिला आहे. विभागातील सौररचना, शैक्षणिक साधने, प्राध्यापक वर्ग, संशोधनपर कार्य, व्यवस्थापन, विकास उपक्रम, प्रवेश प्रक्रिया, प्लेसमेंट्स आणि सीएसआर उपक्रम अशा निकषांवर हा क्रमांक देण्यात आला आहे.
याबद्दल कार्यकारी मंडळाचे चेअरमन प्रमोद काठवी यांनी विभागाचे अभिनंदन केले आहे. या संदर्भात बोलताना डीन डॉ. के. एस. एल. दास म्हणाले, जीआयटीच्या एमबीए विभागाचे विद्यार्थी नेहमी गुणवत्ता यादीत असून आज अत्यंत नामांकित अशा कॉर्पोरेट कंपनीमध्ये कार्यरत आहेत, ही आनंदाची बाब आहे.
प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर यांनी जीआयटी जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यास कटिबद्ध असून व्यवस्थापन मंडळ त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहे, असे सांगितले.









