कट्टा/वार्ताहर
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा, डॉक्टर दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील इ.आठवी ते पदवी पर्यंतच्या 250 विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आला .यावेळी मार्गदर्शन करताना प्रवीण कोल्हे -पोलीस निरीक्षक मालवण म्हणाले की युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून हा स्तुत्य उपक्रम या संकुलामध्ये होत आहे याचे समाधान आहे.स्तुत्य व अत्यावश्यक कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आयोजकांना धन्यवाद दिले.
या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर शुभांगी जोशी यांनी उपस्थित विद्यार्थिनींना, महिला व युवतींवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत विविध दाखले देत समर्पक विवेचन करून अत्याचाराबाबत असणारी दाहकता व सर्वांनी घ्यायची काळजी याबाबत दिशादर्शक असे मार्गदर्शन केले .
पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा खोत यांनी यावेळी POCSO कायद्याबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थिनींनी सजग राहणं किती गरजेचे आहे याचे महत्त्व पटवून दिले .
अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहल गावडे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष असे प्रयत्न केले त्यांच्या सोबत मेघा वजराटकर -सहाय्यक संरक्षण अधिकारी याही उपस्थित होत्या.संस्था सचिव सुनील नाईक विजयश्री देसाई ,मुख्याध्यापक संजय नाईक, ऋषी नाईक, प्रभारी प्राचार्य रविंद्र गावडे , पर्यवेक्षिका देवयानी गावडे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांचा संस्था सचिव सुनील नाईक यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय नाईक यांनी केले. सूत्रसंचालन संजय पेंडूरकर यांनी केले तर आभार स्नेहल गावडे यांनी मानले.









