मिरज :
येथील मिरज-टाकळी रस्त्यावर मद्यधुंद दुचाकीस्वाराने समोरुन आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सांगलीतील बालिका ठार तर चौघेजण जखमी झाले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अनुष्का परशुराम म्हेत्रे (वय 12) असे त्या बालिकेचे नाव आहे.
तिचे वडील परशुराम कल्लाप्पा म्हेत्रे (40), आई सावित्री परशुराम म्हेत्रे (32) आणि भाऊ अथर्व परशुराम म्हेत्रे (14) हे जखमी झाले आहेत. तसेच समोरील दुचाकीस्वार राहूल नंदकिशोर भालेराव (24) हादेखील जखमी झाला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून अपघातस्थळाचा पंचनामा कऊन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळावऊन मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम म्हेत्रे यांची मिरज तालुक्यातील टाकळी येथे शेतजमीन आहे. नागपंचमीनिमित्त म्हेत्रे कुटुंबीय सकाळी शेताकडे आले होते. दिवसभर शेतात वेळ घालविल्यानंतर सायंकाळी दुचाकीवऊन ते सांगलीकडे परत जात होते. मिरज-टाकळी रस्त्यावर समोऊन आलेल्या राहूल भालेराव याच्या दुचाकीने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की म्हेत्रे पत्नी, मुलगी आणि मुलासह रस्त्यावऊन दुचाकीवऊन फरफटत गेले. या अपघातात चौघेही जखमी झाले. मात्र, अनुष्का गंभीर जखमी झाली होती. राहूल हा दुचाकीस्वारही जखमी झाला होता.
अपघातानंतर नागरिकांनी तातडीने जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय ऊग्णालयात दाखल केले. मात्र, अनुष्काचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा केला असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
- बाप निपचित, आईने फोडला हंबरडा
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दोन्ही वाहनांचा वेग प्रचंड होता. नेमकं कोण कोणाला धडकलं, हे समजू शकले नाही. दोन्ही वाहने रस्त्यावर फरफटत गेली. सर्वजणच जखमी होऊन रस्त्यावर लोळत होते. मुलीचा बाप निपचित पडला होता. तर गंभीर जखमी मुलीला पाहून आईने हंबरडा फोडला. तिचा भाऊही रडतच रस्त्यावर बसला होता. दुसरा दुचाकीस्वारही दुचाकीसह जखमी अवस्थेत लोळत होता.








