सांगली :
केस मागे न घेतल्यास घरच्यांना बघून घेतो, अशी धमकी देवून एका युवतीस त्रास देणाऱ्या तसेच तिचा पाठलाग करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ही पीडिता अनुसूचित जमातीतील असल्याने या दोघांवर अॅट्रासिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित नौशाद जमीर शेख (रा. संजयनगर पोलीस ठाण्यामागे, सांगली) आणि रियाज अमीर निडगुंडी (रा. माधवनगर, एसटी स्टॅंड समोरील झोपडपट्टी, सांगली) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, पीडित युवती विश्रामबाग परिसरात राहते. शनिवार सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीत संशयितांनी पीडितेच्या घराबाहेर जाऊन तिच्या नावाने आरडाओरड केली. तसेच संशयित नौशादने पीडितेस, तू माझ्यावर टाकलेली केस मागे घे, अन्यथा तुझ्या घरच्यांना बघून घेतो, अशी धमकी दिली.
झालेल्या प्रकार वेळीच पीडितेने आई-वडिलांना बोलवून सांगितला. त्यामुळे त्यांनी पीडितेस भावाच्या मदतीने पुणे येथे पाठविण्याचे आई-वडिलांनी ठरा†वले. त्यानुसार भावासमवेत ती पुणे येथे जात असताना संशयितांनी त्यांचा दुचाकीवरुन पाठलाग केला त्यामुळे तिने विश्रामबाग पोलीस ठाण्यात येऊन या दोघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस याचा तपास करत आहेत.








