दापोली: प्रतिनिधी
Dapoli Accident News : दापोली तालुक्यातील पिसई ते माटवण फाटा दरम्यान मुंबईहून दाभोळला जाणारी कार झाडाला आदळून झालेल्या अपघातात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आज १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हाशम सारंग यांचे दाभोळ येथील मुंबईस्थित कुटुंब मुंबई येथून दाभोळला आपल्या मूळ घरी निघाले असता हा अपघात झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार सरळ जाऊन झाडाला धडकली. यामध्ये एका ७ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रूग्णालय येथे उपचार सुरु आहेत.









