पोलिसांकडून तपास सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या मालवीय नगर भागात एका महाविद्यालयाबाहेर युवतीवर रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला रॉड तेथेच आढळून आला आहे. तर हत्येनंतर आरोपीने तेथून पलायन केले होते. मृत युवती हे महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. पार्कमध्ये ती तिच्या मित्रासोबत आली होती. युवतीच्या डोक्यावर जखमेची खुण असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी दिली आहे.
अरविंदो कॉलेजबाहेर युवतीवर रॉडने हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांना कळविण्यात आले होते. मृत युवतीचे नाव नरगिस आहे. तर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. युवतीने विवाह करण्यास नकार दिल्याने संतापात तिची हत्या केल्याचे आरोपीने सांगितले आहे. आरोपीचे नाव इरफान असून तो 28 वर्षांचा आहे.









