उपाध्यक्षपदी रघुनाथ सावंत
प्रतिनिधी
बांदा
बांदा निमजगावाडी येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव व सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ निमजगा बांदा यांच्या अध्यक्षपदी गिरीष भोगले, उपाध्यक्षपदी रघुनाथ सावंत, सचिव उमेश धुरी, गुरुप्रसाद गडेकर,खजिनदार पदी शिवराम बहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंडळाने नऊ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . तसेच रोज संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . स्थानिक कलाकारांसाठी रेकॉर्ड डान्स आणि महिलांसाठी फुगडी असे कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहेत.









