क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
हुबळी येथील स्टुडन्ट स्पोर्ट्स अकादमी, हुबळी बुद्धिबळ अकादमी, कर्नाटक मेडिकल कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक राज्य बुद्धिबळ संघटना मान्यताप्राप्त अरे चषक राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावचे प्रमुख गिरीश बाचीकर यांनी 6.5 गुण मिळवत विजेतेपद पटकाविले.
सदर स्पर्धेत राज्यातून अनेक बुद्धिबळपट्ट?नी सहभाग घेतला होता अटीतटीच्या लढतीत बेळगावच्या गिरीश बाचीकर यांनी शेवटच्या लढतीनंतर 6.5 गुणांची आघाडी घेत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे डॉ.एस एफ कमार, डॉ. ईश्वर हजबळ, डॉ. राजशेकर, डॉ. महेश कुमार, रमेश कळसद मुख्य पंच प्रमोद राज मोरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.









