बुध :
गेल्या वर्षीपासून आल्याची लागण जास्त असल्यामुळे आल्याचे बाजार हे कमी झाले होते. गेल्या वर्षी ‘आले’चे बाजार सात ते आठ हजार रुपये प्रति गाडी म्हणजे ५०० किलो असे होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून आल्याचे बाजार वाढल्याचे चित्र आपणास दिसत आहे. यावर्षी झालेल्या जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना आल्याची लागण जास्त करता आले नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण भारतात आल्याची लागण ही अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे आणि आल्याचे बाजार कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी लागण ही करताना कमी केली आहे. त्यामुळे आल्याचे बाजार आपणास वाढताना दिसत आहेत. यावर्षी आल्याचे बाजार उच्चांक घटतील असा अंदाज आहे तरी शेतकऱ्यांनी आले पीक उत्कृष्ट प्रकारे जपावे. यावर्षी आले पिकासाठी शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. देशभरात आले उत्पादनात काही प्रमाणात घट झाल्याचे आणि मागणी वाढल्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी, बाजारात आलेच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून आले उत्पादकांना उत्पादन खर्चही भरून निघत नव्हता. मात्र, यावर्षी उत्पादन क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे काही भागात आले लागवड कमी झाली आहे. दुसरीकडे, मसाल्याच्या वस्तूंना देशांतर्गत तसेच निर्यात बाजारात मागणी वाढत असल्याने आलेच्या दरात वाढ होण्याचे संकेत बाजार तज्ज्ञांनी दिले आहेत.
यावर्षी आले उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगल्या दराची शक्यता आशादायक आहे. मात्र, दर स्थिर राहावेत यासाठी साठवणूक, वाहतूक आणि बाजार व्यवस्थापनात सुधारणांची गरज आहे.
- उत्पादनात घट व दरात वाढ
गतवर्षीची आल्याची लागण होती त्यामधील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आले काढून घेतले. यावर्षी झालेल्या जास्त पावसामुळे आल्याची लागण ही खूप कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे यावर्षी आल्याचे बाजार उच्चांकी दर घटतील. तसेच यावर्षी आलेची लागणसुद्धा उशीरा झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. या मुळे यावर्षी आले बाजार उच्चांकी दर घाटतील.
– अक्षय अशोक जाधव, (आले व्यापारी)








