वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय संघातील सलामीचा फलंदाज शुभमन गिल याने बचावात्मक फलंदाजीवर अधिक लक्ष्य केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. 24 वर्षीय गिलने 25 कसोटी सामन्यात 35.52 धावांची सरासरी राखली असून त्याने भारतात झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत 452 धावा जमविल्या होत्या.
आगामी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर चषकासाठीच्या कसोटी मालिकेचा विचार करुन आतापासूनच आपण बचावात्मक फलंदाजीवर अधिक लक्ष्य केंद्रीत करत असल्याचे गिलने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. बेंगळूरमध्ये सुरु असलेल्या दुलिप करंडक क्रिकटे स्पर्धेत गिल इंडिया अ संघाचे नेतृत्व करीत आहे. या सामन्यात पहिल्या डावात त्याने 43 चेंडूत 25 धावा जमविल्या. भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका आणि त्यानंतर 3 सामन्यांची टी-20 मालिका 19 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान भारतात होणार आहे. यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. वर्ष अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेसाठी भारतातील या वरील दोन मालिका सरावासाठी महत्त्वाच्या ठरतील, असेही गिलने म्हटले आहे.









