वृत्तसंस्था / लाहोर
पाक क्रिकेट संघाचा गोलंदाज प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाच्या जेसन गिलेस्पीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता द. आफ्रिका बरोबर होणाऱ्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पीसीबीने गिलेस्पीच्या जागी माजी वेगवान गोलंदाज अकिब जावेदची गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
पाक आणि द. आफ्रिका यांच्यात पहिल्या कसोटीला 26 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. अकिब जावेद हा सध्या पाक संघाचा हंगामी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2026 साली गिलेस्पीचा पीसीबीबरोबरचा करार संपुष्टात येणार होता. पीसीबी पदाची गॅरी कर्स्टनला पुन्हा बोलविण्याचा विचार करीत आहे. पीसीबीने 2024 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी कर्स्टन आणि गिलेस्पी यांच्याबरोबर दोन वर्षांचा करार केला होता.









