वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला शनिवार 22 मार्चपासून प्रारंभ होत आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलचे सोमवारी येथे आगमन झाले. या स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सने सराव शिबिर आयोजित केले असून या शिबिरात गिल दाखल होणार आहे.
2022 साली गुजरात टायटन्सने आयपीएल चषकावर आपल्या पदार्पणातच नाव कोरले होते. पण गेल्या वर्षी या स्पर्धेत गुजरात टायटन्सने शौकिनांची साफ निराशा केली. 2023 च्या आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सने उपविजेतेपद मिळविले होते. तर 2024 च्या आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सने 14 पैकी केवळ 5 सामने जिंकले होते. गिलने गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेत 12 सामन्यात 426 धावा जमविल्या होत्या. आता 2025 च्या आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी कर्णधार गिलचे प्रयत्न राहतील.









