वृत्तसंस्था/ अहमदाबाद
सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या गुजरात जायंट्स संघाला येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात षटकांची गती राखता न आल्याने या संघाचा कर्णधार शुभमन गिलला स्पर्धेच्या नियमानुसार 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
या सामन्यात गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 7 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात जोस बटलरने नाबाद 97 धावांची खेळी केली. दिल्ली संघाने गुजरातला विजयासाठी 204 धावांचे आव्हान दिले होते. पण गुजरातने 4 चेंडू बाकी ठेऊन विजय मिळविला. गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाने 4 गडी बाद केले होते.









