न्हावेली / वार्ताहर
Gift of literature to Nirwade Primary Health Centre: Initiative of Sandip Pandey
निरवडे येथील कै. उदय उत्तम पांढरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी ग्रामपंचायत सदस्य संदिप पांढरे यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य विषयक साहित्य भेट दिले. यात दोन बेड, फॅन आदी साहित्याचा समावेश आहे. येथील वैद्यकीय अधिकारी विक्रम मस्के यांच्याकडे हे साहित्य सुपूर्त करण्यात आले.यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री-संघाचे चेअरमन तथा माजी सरपंच प्रमोद गावडे, सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, माजी उपसरपंच चंद्रकांत गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप पांढरे, पोलीस पाटील अजित वैद्य, लाडू गावडे, मुरली भाईडकर, सुहास गावडे, सुभाष मयेकर,काका पांढरे ,विलास गावडे ,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.उदय पांढरे हा बहुआयामी व्यक्तिमत्व होता. त्याच्या अपघाती निधनाने जाणे सर्वांच्या मनाला चटका लावून गेला. त्याच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी संदिप पांढरे हे समाज उपयोगी वस्तूंचे वाटप करीत असतात. आज त्यांनी तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य विषयक वस्तूंचे वाटप केले.









