न्हावेली / वार्ताहर
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून पंधरावा वित्त आयोग निधीतून मळेवाड राणेवाडी परबवाडी शाळेला कपाट भेट देण्यात आले. यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी शालेय मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी ग्रामपंचायत कडून वेळोवेळी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले मुलांनी खूप अभ्यास करुन आपल्या शाळेचं व गावाचं नाव उज्ज्वल करावे असे आवाहन मुलांना केले. कपाट भेट दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका धर्णे यांनी ग्रामपंचायतकडून वह्या वाटप करण्यात आले शाळेतील मुलांना ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक यांनी खाऊ वाटप केले.
यावेळी सरपंच मिनल पार्सेकर उपसरपंच हेमंत मराठे ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक अर्जुन मुळीक स्नेहल मुळीक कविता शेगडे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









