प्रतिनिधी /बेळगाव
आजकाल बारा ते सतरा वयोगटातील मुले वेगळय़ा वळणावर जात आहेत. त्यांना समुपदेशनाची गरज आहे. जायंट्ससारख्या संस्थांनी यात पुढाकाराने काम करावे, असा सल्ला प्रा. ऍड. सरिता पाटील यांनी दिला. एसपीएम रोडवरील शिवम हॉलमध्ये जायंट्स सखीचा अधिकारग्रहण कार्यक्रमप्रसंगी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
प्रत्येक सामाजिक संघटनेने परिसरातील शाळांना भेटी देऊन शिक्षकांशी चर्चा केल्यास परिस्थिती समजून त्यानुसार काम करता येईल. याबाबत समाज कुठेतरी कमी पडतोय, असेही त्या म्हणाल्या.
व्यासपीठावर विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, फेडरेशन 6 च्या अध्यक्षा तारादेवी वाली, विभागीय संचालक मदन बामणे, नवनिर्वाचित अध्यक्षा चंद्रा चोपडे, मावळत्या अध्यक्षा नीता पाटील, सचिव सुलक्षणा शिन्नोळकर आणि शीतल पाटील उपस्थित होत्या. चंद्रा चोपडे यांनी मान्यवरांचे स्वागत भेटवस्तू देऊन केले.
ऍड. सरिता पाटील आणि इतरांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. सखीच्या सदस्यांनी प्रार्थना म्हटली. शीतल पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. नीता पाटील यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला.
जायंट्सच्या कामकाजाबाबत समाधान
जायंट्स फेडरेशन 6 चे विभागीय संचालक मदन बामणे यांनी प्रथम अर्चना कंग्राळकर, शीला खटावकर, सीमा वर्णेकर, वैशाली भातकांडे, स्मिता पाटील, प्राची होनगेकर, मंजिरी पाटील, गौरी गोठीवरेकर, मनीषा वांदे, नेहा पाटील, लिला मुंगारी, सरिता देसूरकर, गार्गी काळे या सदस्यांना शपथ दिली. उपाध्यक्ष विद्या सरनोबत, अपर्णा पाटील, सचिव सुलक्षणा शिन्नोळकर आणि खजिनदार अर्चना पाटील, संचालिका ज्योती सांगुकर, ज्योती पवार, राजश्री हसबे, सुवर्णा काळे, शीतल नेसरीकर, सुजाता देसूरकर व अध्यक्षा चंद्रा चोपडे यांना शपथ दिली. मोहन कारेकर आणि तारादेवी वाली यांनी नवीन सदस्यांना किट प्रदान केले आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. मदन बामणे यांनी जायंट्सबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी मोहन कारेकर आणि तारादेवी वाली यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी जायंट्स सखीला सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल मदन बामणे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर यांनी केले. उपाध्यक्षा विद्या सरनोबत यांनी आभार मानले.









