बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ मेनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ रविवारी उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी गोवा येथील माजी सभापती राजेश पाटणेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय समितीचे सदस्य दिनकर अमीन उपस्थित हेते. प्रारंभी जायंट्स प्रार्थना झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तेजस्वी राव यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देऊ केली. अध्यक्ष म्हणून यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे तर सचिवपदी मुकुंद महागांवकर याबरोबरच इतर संचालकांची निवड झाली आहे. दिनकर अमीन यांनी जायंट्स ग्रुपच्या कार्याचा आढावा घेत ही संस्था जगभरात मोठी संस्था म्हणून ओळखली जात असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन मुकुंद महागांवकर यानी केले. आभार लक्ष्मण शिंदे यांनी मानले.
Previous Articleकसबेकर-मेटगुड क्लिनिकवतीने शिबिरात मोफत आरोग्य तपासणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









