पृथ्वीला गिळकृंत करण्याची शक्ती
ज्युपिटर म्हणजेच गुरु ग्रहावर एक भयानक पांढऱ्या रंगाचे वादळ निर्माण झाले आहे. याची रुंदी पृथ्वीपेक्षाही अधिक आहे. हे वादळ गुरुच्या विशाल लाल-करड्या रंगाच्या बेल्टवर घोंगावत आहे. हे वादळ एका बाजूचे नसून वळणदार आहे. पृथ्वीवर ज्याप्रकारे चक्रीवादळ येते, त्याचप्रकारे गुरु ग्रहावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यातून हिरव्या रंगाची वीज कडाडत आहे.
गुरु ग्रहावर वायूंच्या ढगांचा समूह आहे, यामुळे गुरु ग्रहाच्या बाहेरील वायुमंडळाचा रंग नेहमी बदलत असतो. कुठलीही वस्तू एकाच ठिकाणी पूर्वीसारखी राहत नाही. एस्ट्रोफोटोग्राफर माइकर कार्रेर यांनी गुरुच्या वादळाचे छायाचित्र टिपले आहे. तेव्हा त्यांना हिरव्या रंगाचा प्रकाश दिसून आला.
याच्या छायाचित्रांमध्ये दोन मोठे पांढऱ्या रंगाचे स्पॉट मागे-पुढे जात असल्याचे दिसून येते. हे गुरु ग्रहाच्या दक्षिण इक्वेटोरियल बेल्टनजीक आहे. हे करड्या रंगाच्या बेल्टवर अस्तित्वात आहे. ब्रिटिश एस्ट्रोनॉमिकल असोसिएशनचे एस्ट्रोनॉमर जॉन रॉजर्स यांनी हे दोन्ही पांढरे डाग प्रत्यक्षात दोन विशाल चक्रीवादळ असून अशाप्रकारची वादळं 2016-17 मध्ये दिसली होती असे सांगितले आहे.
हे वादळ अत्यंत शक्तिशाली असण्याची शक्यता आहे, कारण याचा आकार अद्याप निश्चित करत आलेला नाही. परंतु हे वादळ सहजपणे पृथ्वीला गिळकृंत करू शकते. हे वादळ दीर्घकाळापर्यंत टिकणार नाही, गुरु ग्रहावर विशाल रेड जायंट असून त्याचप्रमाणे हे वादळ संपुष्टात येणार आहे.
हिरव्या रंगाचे रहस्य
वादळात दिसुन येणारा हिरव्या रंगाचा प्रकाश हा वेगवेगळी रसायने अणि वायूयुक्त ढग आदळल्याने निर्माण झालेला असू शकतो. यापूर्वी देखील वेगवेगळ्या रंगाची वीज कडाडताना दिसून आली आहे. याच बेल्टवर 1973 मध्ये एक वादळ आले होते, जे 1991 मध्ये संपुष्टात आले होते. त्यानंतर तशाचप्रकारचे वादळ 2010 मध्ये काही काळासाठी आले, यामुळे बेल्टच्या रंगात काहीसा बदल होतो, परंतु अधिक काळासाठी नाही असे जॉन रॉजर्स यांनी सांगितले आहे.









