नैसर्गिक संपदाही धोक्यात
भारताच्या नद्यांमध्ये वसलेले गोड्या पाण्याचे विशाल जीव मासे, सरीसृप आणि सस्तन प्राणी वेगाने गायब होत आहेत. हे जीव केवळ पारिस्थितिकी संतुलनाचे सूचक नसून भारताच्या नैसर्गिक संपदेत सुमारे 1.8 ट्रिलियन डॉलरचे वार्षिक योगदानही देतात. परंतु संरक्षणाच्या धोरणांमध्ये त्यांची स्थिती कमकुवत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन आणि वाइल्डलाइफ इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या संयुक्त अध्ययनाने पहिल्यांदाच या संकटाला वैज्ञानिक दृष्टीकोनातून पडताळले आह. तसेच जर धोरणांनी योग्यवेळेत दिशा न बदलल्यास भारताच्या नद्यांची जैवविविधता इतिहास ठरू शकते, असा इशारा दिला आहे. बायोलॉजिकल कंजर्व्हेशनमध्ये प्रकाशित या अध्ययनात भारताच्या गोड्या पाण्याच्या पारिस्थितिकीय व्यवस्थेत 35 प्रमुख प्रजाती मेगाफौना म्हणजेच विशाल जीवाच्या स्वरुपात नोंद असल्याचे म्हटले गेले आहे. यात 19 मासे, 9 सरीसृप आणि 7 सस्तन प्राणी सामील आहेत. यातील 51 टक्के प्राणी गंभीर संकटात आहेत किंवा त्यांच्या अस्तित्वाची निगडित माहितीच अर्धवट आहे.
धोका आणि संरक्षणाची दिशा
भारताच्या नद्यांमध्ये अद्यापही महाशीर, मग, नदी डॉल्फिन आणि सॉफ्टशेल कासव यासारखे जीव सहअस्तित्वात आढळून येतात, परंतु त्यांची संख्या वेगाने घटत आहे. मुख्य धोके औद्योगिक आणि कृषी कचऱ्यामुळे जलप्रदूषण, धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांमुळे प्रवाह बाधित होणे, हवामान बदल आणि ऑक्सिजन पातळीत घट तसेच अवैध शिकार आणि अतिक्रमणामुळे निर्माण झाले आहेत.
गंगा शार्क, सिंधू डॉल्फिनला धोका
सर्वात गंभीर स्वरुपात प्रभावित प्रजातींमध्ये गंगा नदी डॉल्फिन, आणि एल्डचे हरिण आहे. अनेक प्रजाती अद्याप स्वत:च्या मूळ अधिवासाच्या छोट्या छोट्या हिस्स्यांपुरती मर्यादित राहिल्या असून जेथे त्यांचे पुनरुत्पादनही धोक्यात आहे. एल्डचे हरण ज्याला शास्त्राrय स्वरुपात रुकर्वस इल्ली म्हटले जाते, दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियात आढळून येणारे एक दुर्लभ आणि दलदलयुक्त भागातील हरिण आहे. भारताला याला सर्वसाधारणपणे संगाई किंवा थामिन डियर म्हटले जाते. हे मुख्यत्वे मणिपूरच्या लोकटक सरोवरानजीक केईबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यानात आढळून येते. भारताचे मोठे जलीय जीव सर्वात वेगाने गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू आणि नर्मदा या नद्यांमधून लुप्त होत आहेत. गंगा-ब्रह्मपुत्रा खोरे एकेकाळी आशियातील सर्वात समृद्ध गोड्या पाण्यातील जैवविधितायुक्त क्षेत्र मानले जात होते, आता प्रदूषण, धरण आणि वाळू उत्खननामुळे गंभीर संकटात आहे. विशेषकरून गंगा नदी डॉल्फिन, मगरी आणि सॉफ्टशेल कासवांची संख्या उत्तरप्रदेश, बिहार आणि आसामच्या हिस्स्यांमध्ये घटुन आता खंडित समुहांपुरती मर्यादित राहिली आहे.









