खंडणीचा विषय संपल्याचे विधान ; खंडणीप्रकरणाला वेगळे वळण
म्हापसा : राज्यात खंडणीचा विषय गंभीर स्वऊपात असतानाच कळंगूचे आमदार मायकल लोबो यांनी या विषयी घुमजाव करीत हा विषय संपलेला असून आपण किनारी भागात लक्ष ठेवून आहे. आपल्या मतदारसंघात कुठे काय चालले आहे, याकडे बारकाईने पाहत आहोत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या विषयी यापूर्वीच बोलले आहेत आणि हा विषय संपलेला आहे, असे लोबो यांनी म्हटले आहे. लोबो यांनी याविषयी अधिक बोलणे टाळले. काही लोक राजकीय फायदा उठविण्यासाठी सरकारची बदनामी करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, यातील दोषींवर कडक कारवाई होईल. यात कुणाची गय केली जाणार नाही, मग ती व्यक्ती कितीही मोठी आणि कोणाच्याही जवळची असली तरीही या प्रकरणात नक्की कोण आहे? हे स्पष्ट होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.
रेस्टॉरंट मालकाकडून खंडणी उकळल्याचा आरोप
कथित खंडणी मागितल्याचे प्रकरण आठवड्याभरापासून गाजत आहे. उत्तर गोव्यातील किनारपट्टीवर रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये रात्री 10 नंतर संगीत सुऊ असते. निर्बंध असतानाही रात्री उशिरापर्यंत मद्य, जेवण पुरविले जाते असा आरोप कऊन हे प्रकार चालू ठेवण्यासाठी खंडणी द्यावी लागेल असे सांगत काहींनी रेस्टॉरंट मालकाकडून सरकारच्या नावाने पैसे उकळल्याचा आरोप आहे. यासाठी एका आलिशान हॉटेलात बैठक घेऊन सर्व रेस्टॉरंट मालकांना तेथे बोलावून घेऊन खंडणीची मागणी केली होती. बंदर कप्तान खत्याने जप्त केलेल्या 94 होड्या सोडविण्यासाठी त्या मालकांकडून प्रत्येकी 1 लाख ऊपये मागितल्याचीही माहिती उघड झाली आहे. यामुळे हा खंडणीचा प्रकार राज्यभर गाजत आहे.
खंडणीचा विषय संपलेला : मायकल लोबो
माजी आमदार आग्नेल फर्नांडिस काय बोलतात, त्यावर त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. आपल्याबाबत वर्तपत्रातून छापून येणाऱ्या विधानांमध्ये काही तथ्य नाही, असे लोबो यांनी स्पष्ट केले. कळंगूटमध्ये कोणालाच कायदा हातात घेऊ देणार नाही वा चुकीचे कृत्य कऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनीच दिलेला आहे. त्यामुळे त्यापेक्षा जास्त आम्ही बोलू नये, असे सांगून लोबो यांनी पुढे बोलण्याचे टाळले.









