चार महिन्यांपूर्वी अत्यंत नाट्यमय राजकिय घडामोडीनंतर पक्षाचा राजीनामा देऊन कॉंग्रेसला सोडचिट्टी देणारे जेष्ठ कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची घरवापसी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संबंधी चर्चा गुलाम नबी आझाद आणि वरिष्ठ काँग्रेस नेते यांच्यात चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “राजकारणात काहीही होऊ शकते..पण आझादसाहेब काँग्रेसमध्ये परतले तर आम्हाला सुखद धक्का असेल.” 73 वर्षीय गुलाम नबी आझाद यांनी आपल्या राजीनामा पत्रात राहुल गांधींवर टीका करून ते कॉंग्रसच्या कमकुवत व्यवस्थेच्या विरोधात आहेत काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधात नसल्याचे म्हटले होते.
झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान आझाद म्हणाले होते की, “भाजपशी केवळ काँग्रेसच स्पर्धा करू शकते.”आझाद यांच्या वक्तव्यानंतर भारत जोडो यात्रेचे निमंत्रक दिग्विजय सिंह यांनी आझाद यांना राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिल्याचे समजते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









