Ghulam Nabi Azad Party Name : गेल्या महिन्यात काँग्रेसला रामराम करत बाहेर पडलेले जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. नवरात्री महोत्सवा निमित्त आज नविन पक्षाची घोषणा केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ असे घोषित करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना आझाद म्हणाले की, आपल्याकडे जनतेला देण्यासारखे खूप काही आहे आणि ज्यांच्याकडे जनतेला देण्यासारखे काही नाही ते शिव्या देतात. आमच्या पक्षाची विचारधारा ही गांधींची विचारधारा आहे. आमची धोरणे जात आणि धर्मावर चालणार नसल्याचेही आझाद म्हणाले. राजकारणात आपल्याला सर्व धर्मांबद्दल आदर असून, आम्ही सर्व पक्षांचा आदर करतो. आमचे कोणाशीही राजकीय वैर नसल्याचे आझाद यांनी यावेळी स्पष्ट केले.पक्षाची विचारधारा नावासारखी असेल आणि सर्व धर्मनिरपेक्ष लोक त्यात सामील होतील असे स्पष्ट केले आहे.
‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ चा नेमका अजेंडा काय?
जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे आदी मुद्द्यांचा समावेस आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









