सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
श्री नागेश महारुद्र घूड शिबिकोत्सव समिती आडण, मडकईतर्फे सोमवार 27 रोजी फडते कुटुंबीयांतर्फे सकाळी 9 वा. विहिरीच्या पवित्र पाण्याने नागेशी येथील श्री नागेश देवस्थानचा घूड भरणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवस्तुती पारायण आणि शिवमंत्राचे उच्चारण होईल. सकाळी 10.30 वा. महाभिषेक, आरत्या, महानैवेद्य व अन्य धार्मिक विधी होतील. दुपारी 1 वा. सार्वजनिक महाप्रसाद, सायं. 6.30 वा. भजनाचा कार्यक्रम व रात्री 8.30 वा. श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात येईल. भाविक व मडकईकर फडते कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.









