ओटवणे / प्रतिनिधी
Ghost mercy of Mangesh Talwanekar!
पक्षी व प्राण्यांच्या अन्न व पाण्यासाठी ठेवली भांडी
सध्याच्या कडक उन्हाळ्यात पक्षी व प्राण्यांना अन्नासह पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे भूतदयचे पाईक असलेल्या माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी या पशु पक्षांसह प्राण्यांची अन्नासह पिण्याचे पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून सावंतवाडी शहर व परिसरातील जंगलात पाणी व अन्नासाठी भांडी ठेवली आहेत. दर दिवशी या भांड्यातील पाणी बदलले जात असून अन्नही ठेवले जात आहे.
दरम्यान कोरोना संकट काळातही मंगेश तळवणेकर यांनी या पशु पक्षांची अन्न व पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून हाच उपक्रम अव्याहतपणे तब्बल दिड वर्ष राबविला होता. त्यावेळी अनेक पशुपक्ष्यांसह प्राण्यांचे जीव वाचले होते. सध्याही कडाक्याच्या उन्हाळ्यात या पशु पक्षांना अन्न व पाण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळेच मंगेश तळवणेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मंगेश तळवणेकर यांच्या या भुतदयेचे कौतुक होत आहे.
अन्नासह पाण्याच्या दुर्भिक्ष्यमुळे या पक्षी व प्राण्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सर्वांनीच आपल्या घराच्या परिसरात भूतदया म्हणून या पक्षी व प्राण्यांसाठी भांडी ठेवावीत आणि त्यात पाणी व अन्नाची सेवा द्यावी असे आवाहन मंगेश तळवणेकर यांनी केले असून कोणाला भांड्याची आवश्यकता असल्यास त्यांनी ९४२१२६९४४४ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.









