प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी पहिले रेल्वेगेटजवळ बॅरिकेड्स लावून 19 जून रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. सततच्या लढ्यानंतरही बॅरिकेड्स न हटविल्याने दि. 19 जून रोजी दुपारी 4 वा. बॅरिकेड्सजवळच आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे या लढ्याचे प्रमुख सुभाष घोलप यांनी कळविले आहे.
बॅरिकेड्सचा सतत त्रास होत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.









