प्रतिनिधी/ बेळगाव
औद्योगिक क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या घोडावत उद्योग समुहातर्फे बेळगाव, धारवाड आणि हुबळी येथील किराणा दुकाने आणि अन्य आऊटलेट्समध्ये घोडावत कन्झ्युमर लिमिटेडची (जीसीएल) उत्पादने शनिवारपासून उपलब्ध झाली आहेत. नाविन्यता, परवडणारे दर आणि उत्पादनांचा गुणवत्तापूर्ण दर्जा यामुळे जीसीएलची उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरतील, असा विश्वास जीसीएलच्या सीओओ सलोनी घोडावत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
त्या म्हणाल्या, 2013 मध्ये संजय घोडावत ग्रुप या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीची स्थापना करण्यात आली. हवाई उ•ाण, ग्राहकोपयोगी उत्पादने, शिक्षण, उर्जा, खाणकाम, रिटेल आणि टेक्सस्टाईल, रियालिटी या क्षेत्रात हा उद्योग कार्यरत आहे. आता जीसीएलचा स्टार ब्रँड आटा, खाद्यतेल, डाळी, तांदूळ, मीठ विविध प्रकारचे नमकीन विविध प्रकारची शीतपेये, एनर्जी ड्रिंक ही उत्पादने असून यापूर्वी स्टार लोकल मार्ट या रिटेल साखळी अंतर्गत ग्राहकांना ही उत्पादने खरेदी करता येत असत, असे त्यांनी सांगितले.