सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडीतील घे भरारी फाउंडेशन तर्फे येथे जागतिक महिला दिना निमित्ताने शुक्रवारी 7 मार्च रोजी सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे सायंकाळी ५ वाजता खेळ पैठणीचा तसेच फनी गेमआधी कार्यक्रम होणार आहेत. खेळ पैठणी स्पर्धेत प्रथम पारितोषिक पैठणी साडी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाला आकर्षक साडी मिळणार आहे . सायंकाळी५ ते १० या वेळेत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष मोहिनी मडगावकर व अध्यक्ष गीता सावंत ,सचिव मेघना राऊळ ,उपाध्यक्ष शारदा गुरव, खजिनदार मेघना साळगावकर कार्याध्यक्ष रिया रेड्डीज आदींनी केले आहे.









