अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत
अनुष्का शेट्टीची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘घाटी’ यंदा प्रदर्शित होणार आहे. कृष जागरलामुडी यांच्याकडून दिग्दर्शित चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘घाटी’ या चित्रपटाला आदित्य याचे संगीत लाभले आहे. या चित्रपटाचा टीझर सादर करण्यात आला असून यात अनुष्काची झलक चाहत्यांना पसंत पडली आहे. अनुष्का या चित्रपटात विक्रम प्रभूसोबत मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अनुष्का आणि विक्रम प्रभू यांनी यापूर्वी ‘वेदुम’ चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट युव्ही क्रिएशनसोबत अनुष्काचा चौथा चित्रपट ठरणरा आहे. यापूर्वी अनुष्काने अरुंधति, बिल्ला, मिस शेट्टी, मिस्टर पुलिशेट्टी, बाहुबली आणि बाहुबली 2 या चित्रपटांकरता युव्ही क्रिएशनसोबत काम केले होते. अनुष्का दीर्घकाळानंतर ‘घाटी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनुष्का ही अभिनयनिपुण असल्याने तिचा चित्रपट पाहणे हा प्रेक्षकांसाठी नेहमीच एक चांगला अनुभव असतो.









