सागर पाटील, कळंबा प्रतिनिधी
कळंबा ग्रामपंचायतीची निवडणूक आणि सरपंच निवडी होवून अवघे 6 महिने झाले आहेत. तोपर्यंत ग्रामपंचायतीने नागरीकांवर घरफाळा आणि पाणीपट्टी वाढ लादण्याच्या घाट घातला आहे. घरफाळ्यामध्ये प्रति स्केअर फुट 1 रुपयाने तर पाणी पट्टीमध्ये 300 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये याबाबतचा ठरावही केला आहे.
कळंबा ग्रामपंचायतीकडून गावातील मिळकतधारकांकडून घरफाळा,पाणीपट्टी वसुल केली जाते.मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घालताना ग्रामपंचायतीची तारेवरच कसरत होत आहे.त्यामुळे घरफाळा आणि पाणीपट्टी वाढ केल्या शिवाय प्रशासनाला पर्याय नाही.त्यामुळे घरफाळा, पाणीपट्टी वाढीचे प्रस्ताव करण्यात आला.ग्रामपंचयातीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत याला मंजूरीही मिळाली आहे.
बहुतांशी वेळी पाणीपुरवठा बंद,अपुरा पाणीपुरवठा असतो.असे असताना थकबाकी वसुलीकडे दुर्लक्ष करत दरवाढ करण्याचा पर्याय ग्रामपंचायतीने स्विकारला असल्याने ग्रामस्थांमध्ये निराशा आहे.नवीन निर्णायाप्रमाणे घरफाळा दोन रुपये चाळीस पैसे पर स्क्वेअर फुटने आकरण्यात येणार आहे. गतवर्षी हाच घरफाळा 1 रुपया 50 पैसे स्क्वेअर फुटने आकारण्यात येत होता. आता यामध्ये तब्बल 1 रुपयाने वाढ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. याचसोबत पाणीपट्टीमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेतला असून पाणीपट्टीमध्ये तब्बल वर्षाला 300 रुपयांची वाढ केली आहे.पाणीपट्टी आता 1200 रुपयांवरुन थेट 1500 रुपये करण्यात आली आहे.
दर चार वर्षांनी घरफाळा व पाणीपट्टी वाढ करण्यात येते 2019- 2020 या वर्षी वाढ करण्यात आली होती. कळंबा ग्रामपंचायतीच्या परिसरात एकूण 3000 हजार मिळकती आहेत त्यामध्ये सरासरी दर वर्षी घरफाळा सुमारे पन्नास लाखांवर जमा होतो तर नळ कनेक्शन सुमारे 2300 जवळपास आहेत प्रतिवर्षी जवळपास 36 लाखांवर खर्च ग्रामपंचायतीला करावा लागतो त्यातून मिळणारे उत्पन्न 25 लाख आज त्यामुळे जेमतेम खर्च बसावा यासाठी ग्रामपंचयतींने घरफाळा व पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वसामान्यांना वाढ आणि व्यावसायीकांकडे दुर्लक्ष
कळंबा गावाच्या आजूबाजूस सध्या हॉटेल, मंगलकार्यालयाची संख्या वाढली आहे.ग्रामपंचायतीने या मिळकतींना कोणत्याही पद्धतीचा घरफाळा आकारलेला नाही.अशा मिळकतींना घरफाळा लावल्यास ग्रामपंचायतीच्या मिळकतीमध्ये भरघोस वाढ होणार आहे.जवळपास 60 हून अधिक छोटी मोठी हॉटेल तर 10 हून अधिक मंगल कार्यालये,20 हून अधिक टोलेजंग फार्महाउस बांधण्यात आली आहे.सुमारे शंभरहून अधिक या मिळकतींना व्यावसायीक घरफाळा आकारता येवू शकतो,मात्र केवळ राजकीय वरदहस्तामुळेच त्यांना घरफाळ्यातून सुट देण्यात आली आहे.
कात्यायनी पार्कमध्ये ना घरफाळा ना पाणी पट्टी
कळंबा ग्रामपंचयतीमध्ये असणाऱ्या कात्यायनी पार्कमध्ये ग्रामपंचयतीच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येतो, कचरा उठावही करण्यात येतो. मात्र या मिळकतींना गेल्या 20 वर्षापासून कोणत्याही प्रकारचा कर आकारण्यात येत नाही आहे. येथील मिळकत धारकांना ना पाणी पट्टी, ना घरफाळा अशी परिस्थीती आहे. या ठिकाणी असणारे गट्टा मतदान डोळ्यासमोर ठेवून येथील सदस्य याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत. या मिळकती आणि व्यावसायिक मिळकतांना घरफाळा लागू केल्यास सर्वसामान्यांना घरफाळा वाढ करण्याची गरज लागणार नाही, असेही काही ग्रामस्थांचे मत आहे.
उत्पन्ना पेक्षा खर्च वाढल्यानेच दरवाढ
उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालण्यासाठी करामध्ये वाढ करणे आवश्यक आहे.असे केले तरच विकासकामे आणखीन गतीने करता येतील. तसेच पाणीपट्टी 25 लाख जमा होत असून खर्च मात्र,35 लाख आहे. त्यामुळे पाणीपट्टीही वाढ करण्याशिवाय सद्यातरी पर्याय नाही. त्यामुळेच घरफाळा, पाणीपट्टीचा वाढीचा निर्णय घेतला.
दिलीप तेलवी, ग्रामविकास अधिकारी, कळंबा
सद्याची पाणीपट्टी -1200 रूपये
वाढीनंतर पाणीपट्टी -1500 रूपये
सद्याचा घरफाळा – 1 रूपये 50 पैसे प्रति स्क्वेअर फुट
वाढीनंतर घरफाळा-2 रूपये 40 पेसे प्रति स्क्वेअर फुट
एकूण मिळकती -3000
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









