वृत्तसंस्था / अॅकारा (घाना)
2026 साली होणाऱ्या फिफाच्या पुरूषांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी घानाचा संघ पात्र ठरला आहे. या स्पर्धेत पात्र ठरणारा घाना हा पाचवा आफ्रिकन देश आहे.
2026 मध्ये फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त विद्यमाने भरविली जाणार आहे. पात्र फेरीच्या स्पर्धेत घानाचा आय गटातील एकमेव सामना बाकी होता आणि त्यांना पात्रतेसाठी केवळ 1 गुणाची जरुरी होती. या शेवटच्या सामन्यात घानाने कोमोरोसचा 1-0 असा निसटता पराभव केला. पात्र फेरी स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात मालीने मादागास्करचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यानंतर मादागास्कर या गटातून दुसऱ्या स्थानावर राहिला. इ गटातील झालेल्या सामन्यात निगेरने झांबियाचा 1-0 असा पराभव केला. निगेरला या गटात दुसरे स्थान मिळाले.









