रत्नागिरी, प्रतिनिधी
प्रसिद्ध,ज्येष्ठ कीर्तनकार,अभिनेते जीजीपीएस गुरूकुलचे मुख्याध्यापक किरण दत्तात्रय जोशी (वय- ४७) यांचे आज २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले आहे. शहरातील प्रसिद्ध १८ हातांच्या गणपती मंदिराच्या व्यवस्थापनात त्यांचे योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,वडील,आई,भाऊ तसेच काका काकी,पुतणे,पुतण्या असा मोठा परिवार आहे. किरण जोशी यांची अंत्ययात्रा सायंकाळी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.