जगातील सर्वात रंजक नोकरी
जगात अनेक प्रकारच्या नोकऱ्यांबद्दल तुम्ही ऐकले असेल, यातील काही नोकऱ्या इतक्या अधिक जोखिमीच्या असतात ती, त्याबद्दल ऐकूनच माणूस घाबरून जातो. तर काही नोकऱ्यांमध्ये पगाराचा आकडा पाहून माणूस जोखीमच विसरून जातो. पण काही नोकऱ्यांना तुम्ही ड्रीम जॉबपेक्षा कमी लेखू शकत नाही. यातील काम अशाप्रकारचे असते की माणूस त्याला कधीच कंटाळत नाही.

ब्रिट्स स्टॉप नावाच्या एका कम्युनिटीकडून अजब प्रकारचा जॉफ ऑफर केला जात आहे, यात सुमारे 1100 छोटे व्यवसाय असून यात पब्स, मद्यनिर्मितीचा प्रकल्प आणि द्राक्षाच्या बागांचा समावेश आहे. या कम्युनिटीला आता एक पिंट चेसरची गरज आहे. हा जगातील अत्यंत अजब प्रकारचा जॉब आहे, यात मोटरवॅन किंवा कॅम्परव्हॅन स्वत: चालवत फिरायचे असते. ब्रिट्स स्टॉप कम्युनिटीमध्ये 750 हून अधिक पब्स सामील आहेत. या नोकरीत शेकडो सुंदर आणि आनंदमय ठिकाणी फिरता येणार आहे तसेच चांगल्या ठिकाणी वास्तव्याची व्यवस्थाही असणार आहे.
कॅम्पिंग आणि उत्तम प्रतीची बियर पिण्यासाठी या नोकरीदरम्यान पैसे खर्च करावे लागणार नाहीत. युनायटेड किंगडमच्या विविध हिस्स्यांमध्ये या जागा आहेत. पिंट चेसरला एका ठिकाणी केवळ एका रात्रीसाठी थांबावे लागणार आहे. तेव्हा संबंधित नशेत तर नाही ना याची तपासणी होणार आहे. त्यानंतरच तेथून जाता येणार आहे. कर्मचाऱ्याला याकरता एक फर्निश्ड मोटरहोम दिली जाणार असून प्रत्येक दिवसाच्या ट्रिपसाठी पैसे मिळणार आहेत. याचबरोबर ब्रिट स्टॉप्सचे कायमस्वरुपी सदस्यत्व प्रदान केले जाणार आहे. या कामासाठी संबंधित व्यक्तीने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे.









