मिहिर मठकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली मागणी
न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील नियोजित सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी सावंतवाडीतील युवा कार्यकर्ते मिहिर मठकर यांनी आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली. आजच्या दौऱ्यात श्री आव्हाड हे सावंतवाडीत आले असता जयप्रकाश चौक येथे त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. व हा प्रश्न मार्गी लागल्यास सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितले .









