सांगली :
सांगलीतील सकल मराठा समाजाने नुकतेथ विवाह समारंभासाठी आचारसंहिता जाहीर केली. हुंडा बंदी, श्रीमंतीचा बडेजाव न करता साध्या पद्धतीने लग्न करावे. विवाह सोहळा केवळ १०० लोकांच्या उपस्थितीत पार पाडल्यास मंगल कार्यालये ५० टक्के सवलतीत देवू असे महत्वाचे निर्णय मराठा समाजाने घेतले आहेत, आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणाऱ्या पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
मराठा समाज नेहमीच समाजोपयोगी उपक्रमात अग्रेसर असतो. समाजातील कालबाहा रुढी परंपरा नष्ट व्हाव्यात यासाठीही प्रबोधनाचे कार्य करते. सध्या सर्वत्र गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सर्व सामाजिक क्षेत्रात वेगळी चर्चा सुरु आहे. त्यामुळे हगवणे परिवाराने केलेल्या कृत्याचे मराठा समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करत विवाह संबंधित नवी आचारसंहिता जाहीर करण्यात आली. यामध्ये हगवणे परिवारावर बहिष्कार घालण्याचा ठराव करण्यात आला.
हगवणे परिवाराकडून घडलेली चुकीची घटना सर्वच समाजात घडत असतात. तरीही मराठा समाजाला टार्गेट करण्याचे काम सध्या सर्वत्र सुरु आहे. मराठा समाजात लग्नाचे प्रदर्शन होत आहे, असे चित्र उमे केले जात आहे. सर्व राजकीय लोकांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार करावा, असा निर्णय घेण्यात येवून या घटनेचा निषेध करण्यात आला.
लग्नात बडेजाव करु नये, वायफळ खर्च टाळावा, तसेच जावयांचा मान सन्मान होण्यासाठी सोन्याची अंगठी किंवा भेटवस्तू न देण्याचा निर्णय घेण्यात आला. लग्न समारंभ किमान शंभर लोकांत पार पाडल्यास ५० टक्के सवलतीत मंगल कार्यालये उपलब्ध करुन देवू, असेही जाहीर करण्यात आले.
यावेळी अॅड उत्तम निकम, डॉ. संजय पाटील, ए. डी. पाटील, अॅड बिलास हिरुगडे पवार, रोहित पाटील, रघुनाथ पाटील, दत्तात्रय सावंत, नितीन शिंदे, हरिदास पाटील, शशिकांत डांगे, चकोर पाटील, जयवंत सावंत, युबराज शिंदे, विजय भगत, प्रदीप कार्वेकर देसाई, चंद्रकांत पाटील, उदय निकम, विशाल पाटील, ज्ञानेश पवार आदींसह समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर नागरिक उपस्थित होते.
- आचारसंहिता
१०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करावा, हुंडा देवू-घेवू नये, समाजाने अनिष्ट रुींना तिलांजली द्यावी, प्री-वेडिंग बंद कराये, केलेच तर जाहीर वाखवू नये, नवरा-नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये, कर्ज काढून लग्र खर्थ करू नये, समाजात बदल करण्यासाठी प्रत्येकाने प्रथम बदल करावा, सर्वांनी एकत्र येऊन लग्र समारंभातील आचारसंहितेची अंमलबजावणी करावी, त्यासाठी तालुकावार समिती स्थापन करण्यात यावी. लग्रात आहेर देवू-घेवू नये. डिजे साऊंड न वापरता पारंपारिक बाचे बापरावीत. भेटवस्तूऐवजी पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख आहेर करावेत. इतरांचे लग्न पाहून नक्कल करत बडेजाव दिखावा करू नये. अतिरिक्त लग्न खर्च टाळून त्याच रक्कमेची मुलीच्या नावावर एफडी करावी. जेवणात पाच पेक्षा जास्त पदार्थ नकोत. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी असावे. दशक्रिया विधी तिसऱ्या किया पाचव्या विवशी करावा, सामुदायिक किंवा कोर्ट मॅरेज करावे.








