विक्रेत्यांना होणार लाभ : जीईएम मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार सिंग यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारचे सार्वजनिक खरेदी प्लॅटफॉर्म गर्व्हन्मेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) लवकरच तत्काळ कर्ज देण्याच्या सुविधेला चालना देणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही सुविधा आता सर्व विक्रेते, व्यावसायिकांसाठी उपलब्ध होणार आहे. ही सुविधा सध्या एकमेव मालकांसाठी उपलब्ध आहे, असे जीईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार सिंह यांनी सांगितले.
सिंग यांनी सांगितले की, ‘जीईम सहायची योजना फक्त मर्यादित विक्रेत्यांसाठी लॉन्च करण्यात आली होती आणि या योजनेंतर्गत विक्रेत्यांना स्पर्धात्मक दरावर व्याजाची सुविधा मिळत होती. कामकाजी भांडवलात हातभार लावण्यात हे कर्ज उपयोगी ठरत असल्याचे लक्षात आले आहे. कर्ज देणाऱ्यांमध्ये या योजनेत फक्त एनबीएफसीचा (बिगर बँकिंग वित्तसंस्था)समावेश होता. नंतर आयसीआयसीआय आणि कोटक बँक यांचाही मंडळात समावेश झाला आहे. यानंतर मात्र आम्ही ही कर्ज सुविधा आता विक्रेत्यांपर्यंत पोहचवणार आहोत, असेही प्रशांत कुमार सिंग यांनी स्पष्ट केले.
या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्ज सुविधा सुरू होऊ शकते. जीईएम सहाय्य 2 वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आली होती. पैशाची सोय व्याजाच्या आधारे करण्यात येत होती. हे एंड टू एंड डिजिटल सोल्यूशन प्रदान करते आणि त्वरित तारण मुक्त कर्ज प्रदान करते. यासाठी कोणत्याही खरेदीदाराच्या संमतीची आवश्यकता नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सिंग यांनी असेही सांगितले की, आर्थिक वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत जेम पोर्टलद्वारे 1.1 लाख कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यात आली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 6,181 कोटी रुपये होती. केंद्र सरकारचे विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या पोर्टलवरून खरेदी करतात.









