वृत्तसंस्था / म्युनिच
एटीपी टूरवरील येथे झालेल्या 2025 च्या टेनिस हंगामातील म्युनिच खुल्या बीएमडब्ल्यु पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. या जेतेपदाबरोबर व्हेरेव्हला आकर्षक चषक व बीएमडब्ल्यु कंपनीची सुसज्ज कार बक्षीसादाखल देण्यात आली.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात व्हेरेव्हने अमेरिकेचा बेन शेल्टनचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. व्हेरेव्हला 28 व्या वाढदिवशी बीएमडब्ल्यु कार भेट म्हणून मिळाली. चालु वर्षीच्या टेनिस हंगामातील व्हेरेव्हचे हे पहिले विजेतपद आहे. गेल्या सहा स्पर्धांमध्ये व्हेरेव्हला उपांत्यपूर्व फेरी पार करता आली नव्हती. व्हेरेव्हच्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत आतापर्यंत 24 विजेतीपदे मिळविली आहेत. आता 25 मे पासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेसाठी व्हेरेव्हने सरावावर अधिक भर दिला आहे.









