वृत्तसंस्था/ म्युनिच
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या म्युनिच खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीचा तृतीय मानांकित अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हने एकेरीची अंतिम फेरी गाठताना हंगेरीच्या मॅरोझसेनचा पराभव केला. आता व्हेरेव्ह आणि अमेरिकेचा बेन शेल्टन यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात व्हेरेव्हने हंगेरीच्या मॅरोझसेनचा 7-6 (7-3), 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. व्हेरेव्हने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 23 एटीपी स्पर्धा जिंकल्या असून त्याने यापूर्वी 2 वेळा म्युनिच स्पर्धा जिंकली आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या बेन शेल्टनने अर्जेंटिनाच्या सेरुनडोलोचे आव्हान 2-6, 7-6 (7-5), 6-4 असा पराभव केला. सदर स्पर्धा क्लेकोर्टवर खेळवली जात आहे.









